March 30, 2026
पुणे जिल्हा प्रतिनिधी 
               मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.माझ्या सोबत घात पाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झालेला असून, माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचा संशय असल्याचे संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहेत.

              नाशिक जिल्ह्यातील सालेर किल्यावर हा प्रकार घडला असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. सोबतच आपल्याही जीवाला धोका असू शकतो पण याला आम्ही घाबरत नाही. तसेच अशा घटनांची कुठेही जाहीर वाच्यता करत नसल्याचे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

              मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्या देशाची अंमल बजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज पासून पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे . विशेष म्हणजे आपले उपोषण आता कठोर असणार असून, या काळात आपण ना पाणी घेणार, ना उपचार घेणार अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
              मराठा समाजाला सरकारने दिलेल्या राजपत्रित अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी आपण उपोषण करत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. याचवेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले,माझ्या अंगावर गाडी घालून, घात-पात  करण्याचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी त्या वाहन चालकाला ताब्यात देखील घेतले होते. या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाला  फोनवरून माहिती दिली असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
       साल्हेर किल्ल्याजवळ हल्ल्याचा प्रयत्न झाला 
आमच्यासोबत ७ वेळा अशा घटना घडल्या आहेत मात्र याबाबत आम्ही कुठेच जाहीरपणे सांगत नाही. साल्हेर किल्ल्याजवळ आमच्या गाडीवर टेम्पो आला होता, पण आम्ही सरंक्षणाची मागणी केली नाही. तसेच आमच्यासोबत घातपाताचा प्रकार घडला म्हणून देखील कुठे सांगितले नाही. आम्ही साल्हेर किल्ल्यावर गेलो होतो. सर्व गाड्या खाली लावण्यात येतात. मात्र, वरती अचानक कुठूनतरी एक पिक अप तिथे आले. मला त्यावेळी ते लक्षात आले नाही. पण दर्शन करत असतांना पोलीस लवकर चला म्हणून गडबड करत असल्याने मला शंका आली. त्यामुळे खाली काहीतरी घडलं असल्याचे मला जाणवले. पण पोलिसांनी नेमकं काय घडलं याबाबत मला कळूच दिले नाही. पिक अप सारखी एक गाडीचे ब्रेक खराब झाले म्हणून जोरात वरून खाली आली. प्रचंड वेगाने आलेली ही गाडी आमच्या अंगावर आली असती तर आमचा भुगा झाला असता. पण एकाने जोराने आवाज दिल्याने लोकं उड्या मारून बाजूला पडले.
              पोलिसांनी त्या गाडीच्या चालकाला पकडले असता त्याने कोणाच्या तरी नाव घेऊन मला पिक अप घालण्याचे सांगण्यात आल्याचं म्हटले. हा सर्व प्रकार खरं आहे की खोटा आहे याबाबत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडे  केली असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.