March 30, 2026
सुनील भंडारे पाटील 
      जेजुरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असताना उरुळी कांचन ते अष्टापुर यामधील भवरापूर (तालुका हवेली) व अशा अनेक ठिकाणी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे,             

भावरापूर गावांमधील रस्त्याचे आरसीसी बांधकाम करताना आरसीसी बांधकाम किमान दहा ते पंधरा फूट खोल चांगल्या दर्जाचे काम केले असता काम करताना उकरलेल्या खड्ड्यामध्ये भर  म्हणून चांगल्या दर्जाचा मुरुम वापरावा लागतो परंतु कामकाज पाहणारे इंजिनियर व ठेकेदाराकडून ज्या ठिकाणी उकरलेली माती निघालेली आहे त्याच मातीने परत उकलेला खड्डा बुजून टाकला जात आहे आहे, संबंधित कामावरील  इंजिनियर ला विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तर दिली, म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे  चे अधिकारी  बारभाई साहेब यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जर काम निष्कृष्ट दर्जाचे झाले असेल तर त्याचे पाहणी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारावरती कारवाई करून काम  चांगल्या दर्जाचे केले जाईल असे आश्वासन दिले, व येत्या सोमवार किंवा मंगळवारी साईड व्हिजिट करून योग्य निर्णय घेतला जाईल, सदरील बाब रयत शेतकरी संघटनेचे हवेली तालुका अध्यक्ष अनिल कोतवाल यांनी उघडतीस आणून दिली जर हे काम चांगल्या दर्जाचे केले नाही तर रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष एडवोकेट रवी प्रकाश बापूसाहेब देशमुख व पुणे जिल्हा अध्यक्ष रामदास कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येणार आहे,