कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मधुबन मंगल कार्यालय या ठिकाणी रविवारी (ता. ११) मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा समन्वयक सुनील जगताप, हवेली तालुकाध्यक्ष बापूसाहेब काळभोर, तुळशीराम घुसाळकर, संदीप बोडके, अमोल अडागळे, अमोल भोसले, विजय काळभोर, सचिन माथेफोड,सचिन सुंबे, चंद्रकांत दुंडे,जितेंद्र आव्हाळे, विजय तुपे , रियाज शेख, शहाजी नगरे आदी पत्रकार उपस्थित होते.
हवेली तालुका पत्रकार संघाच्या सभासद पत्रकारांच्या कार्यक्षेत्रातील मान्यवर राजकीय पक्ष, व्यक्ती, संघटना, संस्था, सामाजिक कार्यकर्ते, यांनी दैनिकांना, युट्यूब चॅनलला व पोर्टलला वर्षातून कमीत कमी दोन वेळा योग्य प्रकारे जाहीरात देऊन, त्याचे बिल वेळेत दिले तरच त्यांनी घेतलेल्या कार्यक्रमांची बातमी व नावांचा समावेश करावा अन्यथा अशा व्यक्ती, संस्था, संघटना, राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्ते यांच्या बातम्या व नावे छापू नये असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात आली असल्याची माहिती बापूसाहेब काळभोर यांनी दिली.एकदा जाहिरात दिली की तिचे पैसे देण्याचे स्थानिक राजकीय नेते टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले आहे. एखादा स्थानिक राजकीय नेता जाहिरात न देता बातमीत माझे नाव नाही आले अशी विचारणा पत्रकारांना कडे करत असतो जाहिरातीचा विषय काढला की देऊ की म्हणत वेळ मारून नेतो .जाहिरात दिली तरी त्याचे पैसे अनेक दिवस देत नाही .त्यामुळे पुर्व हवेलीत अनेक स्थानिक नेत्यांकडे जाहिरातीची थकबाकी असुन ते पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे हवेली तालुका पत्रकार संघानी हा निर्णय घेतला असुन लवकरच थकबाकी नेत्यांच्या घरी सर्व पत्रकार जाणार असुन थकबाकी वसुली साठी कडक धोरण अवलंबविले जाणार असल्याचे बापु काळभोर यांनी सांगितले.


