March 30, 2026

सुनील भंडारे पाटील 

 
        रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या
निवडणुकीमध्ये शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक (बापू) पवार मा. सभापती
सौ सुजाता (भाभी) पवार व ऋषीराज पवार निवडणुकीसाठी पात्र ठरवल्यामुळे,
सणसवाडी (तालुका शिरूर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाला ग्रामस्थांनी व
सभासदांनी अभिषेक घातला.     

यावेळी पुणे जिल्हा
नियोजन समितीचे सदस्य पंडित आप्पा दरेकर, माजी सरपंच संभाजी साठे, चेअरमन
सुहास दरेकर, माजी उपसरपंच नवनाथ विश्वनाथ हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य
रामभाऊ दरेकर, गोरख भुजबळ, सुभाष दरेकर,

माजी चेअरमन गजाबापू हरगुडे, गुलाब
नाना हरगुडे, सुभाष दरेकर, निलेश दरेकर, बबन यादव, काळूराम हरगुडे,
बाळासाहेब चव्हाण, पोपट दरेकर, अनिल गोटे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ 
उपस्थित होते.