संबंधित प्लॉटिंग व्यवसायाच्या ठिकाणी प्लॉटिंगसाठी महसूल खात्याचे सर्व नियम झुगारून, शेकडो पळवाटा शोधत, हक्काचा रस्ता नसताना राजरोसपणे वन खात्याच्या जमिनीतून प्लॉटिंगला रस्ते टाकलेले आहेत, या भागात राहू रोडच्या दक्षिण बाजूला शेकडो एकर वन खात्याची जमीन आहे, वन खात्याच्या हद्दी शेजारी खाजगी जमिनी असून या जमिनीमध्ये प्लॉटिंगची परवानगी नसताना व्यवसायिक निसर्ग सौंदर्याला गाल बोट लावत, टेकड्या झाडे झुडपे यांची वाट लावत, प्लॉटिंग पाडलेले आहे,
परंतु अशा प्लॉटिंगला जाण्यासाठी स्वतःचा रस्ता नाही, बऱ्याच ठिकाणी शेजारील वन खात्याच्या जमिनीमधून रस्ता बेकायदेशीर काढला आहे, याची कल्पना गुंठा खरेदीदाराला नाही, त्यामुळे भविष्यात हक्काचा रस्ता नसल्याने, किंवा भविष्यात रस्ता बंद झाल्याने, प्लॉट खरेदीदाराने त्या प्लॉटवर जायचे कसे, असा गंभीर प्रश्न तयार होऊ शकतो, त्यामुळे प्लॉट खरीदीदाराने चाणक्ष राहणे गरजेचे आहे, नंतर पोलीस स्टेशन आणि न्यायालयाच्या चक्रा मारणे या गोष्टी घडू शकतात,


