March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
            अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी स्थळ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथे माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात हिंदू धर्माच्या तिथीप्रमाणे साजरी करण्यात आला,        

    कार्यक्रमाची सुरुवात प्रथमता माँ साहेब जिजाऊ,  छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर शंभूराजे प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन त्याचप्रमाणे धर्मवीर शंभुराजे समाधी पूजन, स्वामीनिष्ठ मैत्रीनिष्ठ कवी कलश समाधी पूजन रणरागिनींच्या हस्ते करण्यात आले , यावेळी असंख्य महिला उपस्थित होत्या, याप्रसंगी इतिहास संशोधक ऋत्विक कुलकर्णी यांनी सांगितले की बापाची आणि भावाची हत्या भर दरबारात निजाम शहाणे कशी केली, जिजाऊंचा थोरला मुलगा संभाजी अफजलखानाने धोक्याने मारला, शहाजीराजांना कैद करून आदिलशहाच्या दरबारात द्वेष करून बंदी केले, तरीही जिजाऊ माउली डगमगली नाही, तरी त्यांनी आपल्या पुत्राला सांगितले की तुला कलियुगात श्रीराम व्हायचे आहे, आणि मुलगा म्हणजे स्वामी श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज हे स्वतः म्हणायचे होय माँ साहेब भ्यावे ते रघुनाथा, यौवनांना काय म्हणून घाबरावे, जिजाऊ माँसाहेब म्हणजे साधारण स्त्री नव्हती तर प्रत्यक्ष जगदंबा होती, त्या एक राष्ट्रमाता होत्या, अध्यक्ष स्थानी भिमाबाई भंडारे, प्रमुख अतिथी किशोर महाराज भंडारे, सूत्रसंचालन अंजली देशमुख, प्रास्ताविक नयनाताई आरगडे, जिजाऊ वंदना नूतन भंडारे, विद्या भंडारे, शंभू वंदना उर्मिला भंडारे, मीना भंडारे, शिव वंदना सुनिता भंडारे, विश्वप्रार्थना नयना आरगडे, आभार सुनिता भंडारे यांनी मानले,      

   यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनी, पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या, त्याचप्रमाणे वारकरी सांप्रदायामधील असंख्य वारकरी उपस्थित होते, यावेळी महिलांच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती, उपस्थित्यांचा सन्मान पोलीस पाटील जयसिंग भंडारे यांनी केला, शिक्रापूर वढू बुद्रुक पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता,