March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
     लोणीकंद (तालुका हवेली) येथील श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र भूमकर जुनिअर कॉलेज येथे गतवर्षीप्रमाणे अभियोग्यता चाचणीचे आयोजन २८ मार्च २०२३ रोजी करण्यात आले होते.     

  चाचणीसाठी पुणे व इतर जिल्ह्यामधून १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक प्रतीक दीपक येवगावकर याला मिळाले. त्याच बरोबर तृतीय क्रमांक श्रेया राम शिंदे या विद्यार्थिनीने पटकावला तिला रोख रक्कम 3000 ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर द्वितीय क्रमांक मनस्वी प्रथमेश गायकवाड हिने पटकावला तिला रोख रक्कम 5000 ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या अभियोग्यता चाचणीमध्ये प्रथम क्रमांक प्रिया गंगाधर सातपुते या मुलीने पटकावला या मुलीस रोख रक्कम 7000 व ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

    सर्व मुलांचे कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती (बाप्पू) रामचंद्र भूमकर व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य दिलीप अंकुश धंगेकर व जुनिअर कॉलेजचा सर्व स्टाफ आलेल्या सर्व पालकांनी या सर्व मुलांचे अभिनंदन केले व पुढच्या करिअरसाठी शुभेच्छा दिल्या,  

सन्मानित झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पुढच्या वाटचालीच्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या. अशाप्रकारे या जुनियर कॉलेजमध्ये सातत्याने मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या उपक्रमाचे नियोजन केले जात असते.