March 30, 2026
पीएमपीएमएल मधील सर्व कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करा
पुरंदर कामगार विकास प्रतिष्ठानच्या वतीने कामगारांच्या हितासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन

सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक 
        पीएमपीएमएल मधील सर्व कामगारांना सातवा वेतन आयोग लवकर लागू करावा यासाठी पुरंदर कामगार विकास प्रतिष्ठानच्या वतीने माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे  यांच्या नेतृत्वाखाली  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे   व  उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रज फडणवीस  यांना  प्रत्यक्ष भेटून पत्र देण्यात आले.

 याप्रसंगी पुरंदर कामगार विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितिन गुरव ,परिंचे गावचे सरपंच समिर जाधव,उपतालुका प्रमुख अजितकाका जाधव,सुनिल पोमण,दत्तात्रेय बडदे,संतोष होले,भरत पारठे,संतोष होले,लोकेश केरे,प्रकाशआप्पा जाधव ,हनुमंत खेडेकर, 

दिपक काळे, जावेद तांबोळी ,बाबूल नेटके,ज्ञानेश्वर जावळेकर,मॅचिंद्र काळे,
किरण खोंड उपस्थित होते.