टाकळी हाजी येथील पोलिस अंमलदार सुरेश नागलोत यांना या प्रकरणी गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळताच त्यांनी संशयित व्यक्तींची खात्री करून घेतली . पोलिसांनी पांडुरंग शिवाजी बोडरे, मोन्या उर्फ कुलदीप बबन बोडरे (दोघे राहणार रावडेवाडी) तसेच आफ्तर हुसेन खान आणि त्याचा एक सहकारी (सध्या राहणार आमदाबाद, मूळ परप्रांतीय) यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. शेतकऱ्यांना विकलेल्या आणि त्यांच्याकडे असलेल्या विद्युत मोटारी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
मोटार चोरी,केबल चोरी , घरफोडी, दुकान फुटणे असे अनेक प्रकार या भागात सातत्याने घडू लागल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते .शेतकरी संघटना आवाज उठविण्याच्या पवित्र्यात होती . एवढ्या मोठ्या प्रमाणात कृषि मोटारी मुद्देमालासह पकडल्याने शेतकरी वर्गातून पोलिसांच्या या कामगिरीवर समाधान व्यक्त होत आहे.


