सरपंच संगिता हरगुडे यांचे हस्ते ध्वज रोहनानंतर खाऊ वाटपा सोबत मयुर प्रिंटर्सचे नवनाथ दरेकर व मनसेचे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांचे सौजन्यांने सणसवाडी, वसेवाडी , डिग्रजवाडी , ढेरंगेवस्ती कोरेगाव , घोलपवाडी ,वाडापुनर्वसनचे जि प . शाळांनी व नरेश्वर हायस्कूलचे छात्रांना पाच हजार हरीपाठांचे वाटप करण्यात आले . यावेळी सरपंच संगीता नवनाथ हरगुडे , उपसरपच सागर दरेकर , माजी सरपंच रमेश सातपुते , स्नेहल भुजबळ, गोरखनाना भुजबळ , ग्रां . सदस्य दतात्रय हरगुडे, शशीकला सातपुते, उपसरपंच अँड. विजयराज दरेकर , पै. बाबासो दरेकर , ग्रामविकास अधिकारी पवने , ग्रा. सदस्य राजेंद्र दरेकर , रुपाली दरेकर ,सुवर्णा दरेकर , दगडूनाना दरेकर , रामदास दरेकर , गणेश दरेकर , व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल दरेकर, सुरज दरेकर, मुख्याध्यापक भंडारे , शिक्षकवृंद व पालक उपस्थीत होते .
सुनंदा दरेकर यांनी मुलांच्या मध्ये संस्कार , अध्यात्म -परमार्थ रुजावा हेतूने मोठे अवजड ग्रंथ रामायण , महाभारत , गिता – गाथा यांऐवजी लहान मुलांच्या किशात व डोक्यात बसेल असा माऊलींचा छोटा हरीपाठ देवून पायाभरणी केली . नवपिढीतील मुले फार हुशार आहेत . पण जे चांगले ते त्यांचे पर्यंत पोचत नाही . शाळेत मुलांना काटकोन , त्रिकोण , चौकोन शिकायला मिळतो पण जिवन सुखी समाधानाने यशस्वी रीत्या जगण्यासाठीचा विशाल दृष्टीकोन हा फक्त संत समाज सुधारकांच्या विचारात च मिळतो म्हणून खाऊ ऐवजी सतत पाठीशी रहाणारा हरीपाठ दिला , असे दरेकर यांनी सांगितले,



