March 30, 2026

सुनील भंडारे पाटील

             शिरूर हवेलीचे लोकप्रिय माजी आमदार बाबुरावजी पाचरणे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सणसवाडी (तालुका शिरूर) येथे शोकसभा घेण्यात आली,     

गावामधील भैरवनाथ मंदिर येथे घेण्यात आलेल्या शोक सभेमध्ये, सणसवाडी मधील सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते, पाचरणे समर्थक, इतरपक्षीय कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली,       

भाजपा कामगार आघाडीचे शिरूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब दरेकर यांनी सांगितले की, पाचारणे यांचा स्वभाव मनमिळावू होता त्यांनी कधीही भेदभाव मानला नाही, निवडणूक ही फक्त तेवढ्या ठराविक कालावधीसाठी असायची त्यानंतर त्यांचे सर्वांशी सलगी चे संबंध होते, त्यांची सर्वांना मदत असायची, जनतेची सेवा करण्यामध्ये कायम त्यांचा कल असायचा, असा सर्वसामान्यांचा नेता हरपला, बोलताना त्यांना दुःख अनावर झाले, 

माजी आमदार बाबुरावजी पाचरणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी यावेळी सभापती मोनिकाताई हरगुडे, सरपंच संगीता हरगुडे, उपसरपंच सागर दरेकर, ,माजी सरपंच सुनंदा दरेकर, वैभव यादव, दत्ता पठाण,विजय दरेकर, विद्याधर दरेकर, अंबादास कुरंदळे, महादेव वाखारे, अमोल हरगुडे, अशोक हरगुडे, व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,