सुनील भंडारे पाटील
शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या
वाढदिवसानिमित्त सणसवाडी (तालुका शिरूर) येथील कृष्णलीला मंगल कार्यालयात
राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने तरुणांसाठी भव्य अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन
करण्यात आले होते,
या रोजगार मेळाव्यासाठी उस्फुर्त सहभाग मिळाला सुमारे 45 कंपन्या सहभागी झाल्या
होत्या, 470 तरुणांना रोजगार मिळाल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे
सदस्य पंडित आप्पा दरेकर यांनी दिली, पुणे जिल्ह्यात रांजणगाव, हिंजवडी,
चाकण,सणसवाडी या महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी
सहभाग घेतला होता, आमदार पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिरूर आणि हवेली
तालुक्यातील बेरोजगार तरुणांसाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन रवी बापू
काळे, सागर निंबाळकर, संतोष दौंडकर, अमित गव्हाणे यांनी केले होते,
यावेळी
आमदार अशोक बापू पवार, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर, पीडीसीसी उप चे
चांदेरे, युवा नेते ऋषीराज पवार, सभापती मोनिकाताई हरगुडे, मार्केट कमिटी
सभापती काका कोरेकर, माजी सभापती शंकर दादा जांभळकर, खरेदी विक्रीचे
राजेंद्र नरवडे, बाळासाहेब नरके, निखिल तांबे, स्वप्निल ढमढेरे, विश्वास
ढमढेरे, सागर दरेकर,रवींद्र फडतरे, विद्या भुजबळ, रामभाऊ दरेकर, सुभाष
दरेकर, निलेश दरेकर, नवनाथ दरेकर, व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित
होते, यावेळी परिसरातील सुमारे 470 तरुणांना ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने
मुलाखत घेऊन तातडीने कामावर रुजू होण्याचे पत्र देण्यात आले, या रोजगार
मेळाव्यामुळे बेरोजगार तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराची संधी
मिळाल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे,


