लोणी काळभोर प्रतिनिधी अनिकेत मुळीक
लोणी काळभोर (तालुका हवेली)दि.४/८/२०२२ रोजी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, पुणे शाखेतर्फे लोणी काळभोर संत निरंकारी सत्संग भवन येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.विद्यमान सरपंच माधुरी राजेंद्र काळभोर यांचे हस्ते उद्घाटन समारंभ झाला.
यावेळी सरपंच म्हणाले रक्तदानाचे पुण्य फार मोठे आहे. चरकांच्या शास्त्राप्रमाणे रक्तदान हेच जीवनदान आहे.रक्तदान हे प्रत्येक नागरिकाने करायला हवे जेणेकरून प्रत्येक रक्तगटातील रक्त उपलब्ध होऊ शकेल.संत निरंकारी मिशनचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांचं निधन झाल्यानंतर त्यांची मुलगी सुभिक्षा यांनी संत निरंकारी मिशनची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळली असून जगभरात या मिशनद्वारे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.
सदगुरु माता सुदिक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या कृपा आशीवार्दाने संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशनच्या वतीने संपूर्ण देशामध्ये स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, सामुदायिक विवाह सोहळा, सत्संग शिबीर आयोजित केले जातात, त्यातून मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन आणि समाज कल्याण साध्य केले जात आहे. ही परंपरा पुणे शाखेने कायम ठेवली आहे याचा समाजाने आदर्श ठेवला पाहिजे. समाजामध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवणे, तरुण पिढीमध्ये रक्तदानाबद्दल जागृती निर्माण करणे, निरोगी व तंदुरुस्त असताना देखील जे लोक रक्तदान करत नाहीत त्यांना रक्तदानासाठी प्रेरणा देणे हा स्वैच्छिक रक्तदान शिबिराचे हेतू असतात.
आजच्या कार्यक्रमाचे झोनल इंचार्ज – ताराचंद करमचंदानी, संयोजक – दत्तात्रयजी सातव, मांजरी विभागाचे रोहिदासजी घुले, लोणी काळभोर विभागाचे – राहुलजी काळभोर, उरुळी कांचन विभागाचे – किशोरजी लोणारी, आधारस्तंभ- रामदास गवारे, सर्व अनुयायी त्यांच्या टीमने उत्कृष्ट नियोजन केले होते.
यावेळी पंचायत समिती हवेलीचे – मा. उपसभापती सनी काळभोर यावेळी बोलताना म्हणाले एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या मर्जीने रक्तपेढीत किंवा रक्तदान शिबिरात रक्त देणे म्हणजे रक्तदान! रक्तदान हे स्वैच्छिक असले पाहिजे. कोणत्याही मोबदल्यात रक्तदान करणे, बदली रक्तदाता होणे अशा संकल्पना नष्ट करून स्वैच्छिक रक्तदानाची मोहीम जनमानसात रुजू करणे गरजेचे बनले आहे.मा.उपसरपंच – राजेंद्रआबा काळभोर, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष -अमित काळभोर,दिग्विजय शरद काळभोर आदी मान्यवरांसह अनुयायी मोठया संख्येने उपस्थित होते.

