पुना ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर तसेच श्रीकांत दादा पाटोळे यांच्या सहकार्याने आरोग्य कार्ड च्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला रक्तदात्यास एक हेडफोन व हेल्मेट वस्तू याप्रसंगी भेट देण्यात येणार आली अनेक नागरिकांनी आरोग्य शिबिरामध्ये तपासणी करून व रक्तदात्यांनी याप्रसंगी रक्तदान करून या शिबिराचा लाभ घेतला,
याप्रसंगी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप नाना वाल्हेकर, पुणे जिल्हा सरचिटणीस प्रदीप भाऊ कंद, पुणे जिल्हा उपाध्यक्ष शोभा हरगुडे, हवेली तालुका अध्यक्ष सुरेखा भोरडे ,संध्या भोर , कविता शेडगे ,सीता जाधव, श्यामल लवटे , लीलाबाई हरगुडे,अल्पसंख्यांक सेलचे हसन शेख, ओबीसी सेलचे भरत चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि श्रीकांत दादा पाटोळे मित्र परिवारातील कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते


