शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
शिरूर, आण्णापुर व टाकळी हाजी बेट भागामध्ये लागोपाठ कृषी पंप व केबल चोरीचे प्रमाण वाढले होते. शेतकऱ्यांना शेती पिकाला पाणी देण्यासाठी कृषी पंप व केवल हे आवश्यक गोष्ट असल्याने त्याच गोष्टीची चोरी होत असल्याने शेतकरी हवाल दिल झाले होते,
त्याबाबत समाज माध्यमा मधुन पोलीसांच्या कामगीरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते त्यामुळे पोलीस अधीक्षक अंकित गोयल पुणे ग्रामिण यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांना सुचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांनी शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीसांचे वेगवेगळे पथके तयार करून सतत त्या
गुन्हयाचे तपासामध्ये सातत्य ठेवुन पोलीस पथकाच्या मार्फत गुप्तबातमीदारा मार्फत माहीती काढुन कृषी पंप व केबल चोरी करणारी टोळी तसेच चोरीची केबल व कृषी पंप घेणारा असे जेरबंद केलेली आहे. त्यामध्ये १) वैभव सुरेश पाराटे वय २३ वर्षे २) गौरव रामचंद्र पाराटे वय १९ वर्षे ३) सुरेश मारुती पाराटे वय ६० वर्षे सर्व रा. टेमकरवस्ती टाकळीहाजी ता. शिरूर जि. पुणे ४) रज्जाक दाउद शेख वय ५९ वर्षे रा. हल्दी मोहल्ला शिरूर (भंगार व्यवसायीक ) यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांचे कडुन चालु स्थितीतील १२ कृषी पंप व केबल असा एकुण १,३८,१००/-रु. चा माल
हस्तगत करून एकुण १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. इतर ही अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन त्याप्रमाणे अधिक तपास शिरूर पोलीस करत आहेत.
सदरचे गुन्हे उघडकीस आल्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांचे शेतीसाठी उपयुक्त असलेले
चोरीला गेलेले कृषी पंप व केबल त्यांना परत मिळण्याचे मार्ग मोकळे झाले आहे त्यामुळे शिरूर व बेट भागातील शेतकऱ्यांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी शेतक-यांना त्यांचे नदीकिनारी असणा-या कृषी
पंपाचे संरक्षण करण्यासाठी गट तयार करून त्या ठिकाणी रात्रीचे वेळी आळीपाळीने गस्त करावी त्यांना पोलीस मदत देण्यात येईल असे आव्हान केले आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अपर पोलीस अधिक्षक मितेश गटटे, पुणे व उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी,शिरूर
यांचे मागदर्शना खाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, शिरूर पोलीस ठाणे,पो नि सुनिल उगले, पो नि एकनाथ पाटील, सहा. फौजदार माणिक मांडगे, धनजंय थेउरकर, विनोद मोरे,पो.कॉ. रघुनाथ हाळनोर, सुरेश नागलोत, विशाल पालवे, दिपक पवार, विष्णु दहीफळे या टिमने केलेली आहे.

