वृक्षारोपण करूण एक आगळीवेगळी आदरांजली पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ग्रीन फाऊंडेशनने वाहिली..स्वच्छ, सुंदर व हरित महाराष्ट्र ही संकल्पना ग्रीन फाउंडेशनकडून राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने हवेली तालुक्यात विविध ठिकाणी पर्यावरण पुरक कार्यक्रम हाती घेतले जात असून ठिकठिकाणी ‘स्वच्छता मोहिम व वृक्षारोपण करण्यात येत आहे,
वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त लोणी काळभोर पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल च्या परिसारामध्ये पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल ज्युनियर कॉलेज व ग्रीन फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे. या वृक्षारोपणाचा शुभारंभ ॲड .श्रीकांत भिसे साहेब यांच्याहस्तें. करण्यात आला. यावेळी पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, सर्व शिक्षक व मुख्याध्यापक , ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, विभा गिरिश ट्रस्ट उपस्थित होते.



