इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडली. आजच्या एक दिवसाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून तनुजा ढगे या विद्यार्थिनींनी काम पाहिले.एक दिवसाचे शिक्षक होत असताना त्यांनी शिक्षकांना रोज विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिव धनुष्य पेलावे लागते याचा प्रत्यय आला. या शिक्षणाच्या कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण सर, कुरकुटे सर, भंडारे सर, श्रीमती कंद मॅडम आणि वनवे सर यांनी नियोजन केले. इयत्ता पाचवी ते नववीचे विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी तासवारी द्वारे अध्यापन केले.
विद्यार्थ्यांना सहकार्य सोनवणे सर, कदम सर, श्रीमती मोकाशी मॅडम, श्रीमती काकडे मॅडम, शिंदे सर, भामरे सर, आग्रे सर आणि साळुंखे मॅडम यांनी केले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आयुष्यावर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांमधून सीमांत शिंदे, उत्कर्षा दोरगे आणि अंकिता साळुंखे यांनी विद्यार्थी शिक्षण मनोगते व्यक्त केली. शिंदे सर यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षक मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी इयत्ता दहावीच्या वर्गाकडून सर्व शिक्षकांचा श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिका भंडारे,प्राजक्ता भंडारे तर आभार प्रदर्शन गायत्री फरताळे, श्रावणी भंडारे यांनी केले.


