सुनील भंडारे पाटील
सणसवाडी (तालुका शिरूर) येथे ढगफुटीत काल झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढ्या नाल्यांना भरगच्च पाणी भरून वाहू लागले होते, अशात काल सायंकाळी गावांमधील ओढा ओलांडताना गावातील एक व्यक्ती सायकल सह वाहून जात असताना, जीव धोक्यात घालून सणसवाडी चे माजी उपसरपंच सागर भाऊ दरेकर यांनी स्वतःला ओढ्यात झोकून घेऊन त्याचे प्राण वाचविले,
गावामधील महत्त्वाच्या रस्त्यावर आडव्या जाणाऱ्या ओढ्याला खूपच पाऊस झाल्यामुळे पूर आलेला होता,
ओढ्यामध्ये पाणी न मावल्याने पुलावरून अति वेगाने वाहणाऱ्या पाण्यामधून गावातील दीपक विलास दरेकर यांनी धाडस करून प्रवेश केला, परंतु मध्यभागी गेल्यानंतर पाण्याचा अतिवेगामुळे कमरे एवढ्या पाण्यात सायकल व स्वतःचा तोल त्यांना सांभाळता आला नाही, व ते पाण्यामध्ये वाहू लागले, लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर माजी उपसरपंच सागर भाऊ दरेकर यांनी वाघासारखे धाडस करत स्वतःला झोकून दिले, आणि वाहून चाललेल्या दीपक दरेकर यांना सायकल सह बाहेर खेचून आणले, त्यांच्या या धाडसाबद्दल परिसरातून कौतुक व्यक्त होत आहे,सद्यस्थितीत सणसवाडी व आसपासच्या गावांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून परतीच्या वळवाच्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे, त्यामुळे ओढे नाले, भरून वाहत आहेत कित्येक गावाला जोडणारे ओढ्या लगत रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने रस्ते बंद होत आहेत, या पाण्यामधून कोणीही प्रवास करू नये, पाणी ओसरेपर्यंत थांबावे, असे आवाहन सणसवाडी चे माजी उपसरपंच सागर भाऊ दरेकर यांनी केले आहे,


