March 30, 2026
लोणी काळभोर प्रतिनिधी 
            हवेली तालुक्यातील श्री रामांचा पदस्पर्शाने पावन झालेल्या लोणी काळभोर नगरी, अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निम्मित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या साठी ठिक ठिकाणावरून रामभक्त हजोरोंच्या संख्येने उपस्थित होते. तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयामध्ये गर्दीचा अक्षरशः महापूर लोटला होता. दत्त मंदिर ते रामदरा, अशी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये.शाळकरी ,वारकरी ,टाळकरी भाविक भक्त ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, सनई चौघडा, टाळ मृदंग आणि भजनाचा गजर, त्याचबरोबर रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय. जयघोष करण्यात आला,

           दरम्यान रामदरा शिवालयात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तीन दिवस हा सोहळा मोठ्या उत्साहात सुरू होता. दिवाळीपेक्षाही मोठ्या

थाटामाटात रामलल्लाचा सोहळा साजरा पार पडला. गावातील संपूर्ण रस्त्यांवर आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली,लोणी काळभोर येथील दत्त मंदिरापासून सकाळी आठच्या सुमारास श्रींची भव्य मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास रामदरा शिवालयात मिरवणूक पोहोचली. रामदरा शिवालयाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर रामदरा शिवालयात दुपारी महाआरती महंत हेमंतपुरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली.श्री रामलल्लाची प्रतिष्ठापना सोहळा दुपारी १२ वाजून ५०मिनिटांनी संपन्न झाला. यावेळी भाविकांनी अक्षदा वाहिल्या. त्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी पोलिसांनीही हि उत्तम असे सहकार्य केले.