मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी प्रसारमाधयमांद्वारे माहिती दिली आहे.मराठा समाजाला पुन्हा एकदा टिकणारे आरक्षण मिळणार आहे. असे पाटील यावेळी बोलत होते. संपूर्ण सुनावणीबाबत बोलतांना विनोद पाटील म्हणाले आहेत की, “सुप्रीम कोर्टामध्ये ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती त्याची सुनावणी आता संपली आहे. मला विश्वास असून, त्याची तीन कारणं आहेत. पहिला कारण म्हणजे, न्यायालयाने ज्याच्यामुळे आरक्षण रद्द केलं ते म्हणजे आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राला आहे की राज्य सरकारला आहे. मात्र, राज्याला याचे अधिकार आहे, याबाबतचा कायदा संसदेत झाला आहे. दुसरा मुद्दा होता ५० टक्केच्या मर्यादेचा होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने स्वतः ईडब्ल्यएस आरक्षणामध्ये दहा टक्केची ओलांडलेली मर्यादा मान्य केली आहे. तिसरा मुद्दा आहे मराठा समाज मागासलेला आहे का?, तर, मराठा समाज मागासलेला असल्याचे अनेक उदाहरण आहेत. आम्ही स्वतः जनावरांसोबत गायीच्या गोठ्यात झोपत आहोत, यापेक्षा दुसरं मोठं उदाहरण असू शकत नाही,असे विनोद पाटील म्हणाले.
