लहान मुलींना चाकलेटची, मोठ्या मुलींना गिफ्ट मोबाईलची, लग्नाची अमिषे दाखवून फसवलं गेल्याच्या बातम्या पहाता नवपिढीला संस्काराची गरज असून अशा दुर्घटना टाळाव्यात . पाश्चात्य संस्कृतीचं फॅशनच्या नावाखाली अंधानुकरण नको . त्या सैराट पिक्चरमध्ये दिग्दर्शकाला उच्चनिच, जातीपाती, भेदभाव नको असा संदेश द्यायचा होता पण तरुणाईनं नुसतं गाण्याच्या तालावर नाचत वेगळाच आदर्श घेवून करमाळ्या नजीकच्या दिडशेवर मुली सैराट होत पळाल्या, अन महिनाभरात बरबाद – बदनाम होऊन पार्सले परत वापस आली पण त्यांना घरात घेतलं नाही .कारण एकदा बदनाम झालेल्या मुलीला समाज स्विकारत नाही . म्हणून आपल्या जन्मदात्या बापाला मान खाली घालावी लागेल असे वर्तन आयुष्यात नसावे, असे प्रखर विचार मिडगुले यांनी मांडले . प्राचार्य शत्रुघ्न थोरात यांनी स्वागत व पर्यवेक्षक येलभर व सचिन वागचौरे यांनी हभप मिडगुले यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला . यावेळी ज्ञानयोग सुगंधालयातर्फे अध्यात्माची आवड असणाऱ्या मुलांना हरीपाठ देणेत आले .

