March 30, 2026
लोणी काळभोर प्रतिनिधी
       सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून आपण रेल्वे कडे बघतो रेल्वे मध्ये प्रवाशांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात त्यामध्ये वॉशरूम झोपण्यासाठी अंथरून पांघरून सुद्धा रेल्वेमध्ये मिळते हे करत असताना रेल्वेतील कापड येथील कदमवाकवस्ती (ता हवेली) येथील नावाजलेल्या शाळेच्या टेबलवर दिसून आले.

         कदमवाकवस्ती येथील एका शाळेत विद्यार्थी व पालकांचा ओपन डे चालू होता .त्यावेळी एका पालकाचे सहज लक्ष एका टेबलावर टाकलेल्या कापडावर गेले .त्यामध्ये सेंट्रल रेल्वे  10/2018 असे लिहिले होते .व पुढे मध्य रेल्वे असे लिहिले होते . त्यामुळे हे 2018चे रेल्वेचे कापड शाळेत आलेच कसे याविषयी पूर्व हवेलीतील नागरिकांच्या मध्ये चर्चा  असून सरकारी कापड खाजगी शाळेत आले कोठुन . शाळेचा व रेल्वेचा कसलाही संबंध नसताना ते कापड शाळेच्या टेबलावर टाकले जाते याचे आश्चर्य पूर्व हवेलीत  नागरिकांना वाटत आहे .

      त्यामुळे शाळा किती जागरूक आहे हे या घटनेवरून दिसून येते . या मग शाळेत  विद्यार्थ्यांना शिक्षण देताना किती जागरूता पाळली जात असेल हे या घटनेवरून दिसून येते .या विषयी रेल्वे संबंधित असलेल्या अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता रेल्वेची कुठलीही वस्तु बाहेर आणता येत नाही असे सांगण्यात आले .मग  हे  छापील कापड  शाळेत आले कोठून यांचे आश्चर्य वाटत आहे .शाळा प्रशासनाने याबाबत स्पष्ट नकार दिला असून आमचा व रेल्वेशी काही संबंध नाही शाळा प्रशासन स्पष्ट नकार देत असेल तर हे टेबल वरचे स्पष्ट शब्दात लिहिलेले रेल्वेचे कापड आले कुठून याची चौकशी रेल्वे प्रशासनाने करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे .