वारकरी साहित्य परिषद पुणे जिल्ह्याच्या वतीने डॉ. आंबेडकर हॉल धानोरी पुणे येथे प्रचंड गर्दीमध्ये मोठ्या आनंदमय आणि चैतन्यमय वातावरणात १२ वा. वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला.८९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस हे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते.
तसेच देहू देवस्थानचे अध्यक्ष ह भ प पुरुषोत्तम महाराज मोरे, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे परंपरा गत चोपदार राजाभाऊ, आकाशा एवढा या कादंबरीचे लेखक आणि तुकाराम महाराजांचे वंशज ह. भ. प. संभाजी महाराज मोरे देहूकर, आळंदीचे वा सा प कार्यकारणी सदस्य ह भ प संजय दादा घुंडरे, ह भ प कबीर महाराज, वा.सा.प. पुणे जिल्हा अध्यक्ष ह भ प प्रशांत महाराज मोरे देहूकर, महिला अध्यक्ष ह.भ. प.गोदावरीताई काळे सचिव हभप लक्ष्मण शेठ शेरकर, कार्याध्यक्ष विठ्ठल आण्णा भापकर, हभप अनंतराव गटकळ, खजिनदार आणि पुणे शहर अध्यक्ष ह भ प आनंदराव महाराज कदम, पुणे शहर कार्याध्यक्ष हभप नितीनमहाराज गायकवाड, जिल्हा कार्यकारणी सदस्य अरुण झांबरेसर, ह भ प विजय अधिकारी महाराज, कैलास देवकर, हवेला तालुका कार्याध्यक्ष पांडुरंग अण्णा घुले, सहसचिव ह भ प शामराव महाराज गायकवाड,
हवेली तालुका अध्यक्ष मोहन महाराज मगर, मुळशी तालुका महिला अध्यक्ष ह.भ.प.मनीषाताई गोळे,उपाध्यक्ष हभप जयवंतमहाराज मेंगडे, पुणे जिल्ह्यातील आणि तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि भजनी मंडळे मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ श्रीपाल सबनीस यांनी प्रशांत महाराजांच्या संघटन कौशल्याचे कौतुक केले. अशा प्रकारचा बहुआयामी सोहळा त्यांनी अनुभवला नसल्याचे प्रतिपादन केले.
तसेच वारकरी सांप्रदाया विषयी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी ह भ प संभाजी महाराज मोरे लिखित ‘आकाशाएवढा’ या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. वै.ह भ प रामदासजी कुटे यांना मरणोत्तर वारकरी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ह भ प गंगारामबुवा डुंबरे यांना त्यांच्या तपपूर्ती योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. हभप लक्ष्मण शेठ शेरकर यांनी आभार प्रदर्शन केले.