March 30, 2026
राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ बालाजी पेनुरकर
राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे कडून नांदेड जिल्हा जिल्हाध्यक्ष जाहीर

 सुनील भंडारे पाटील 

           राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य या पत्रकार परिषदेच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी डॉ. बालाजी पेनुरकर यांची संघटनेचे संस्थापकीय केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांच्याकडून जाहीर करण्यात आली,केंद्रीय संस्थापक अध्यक्ष मधुसूदनजी कुलथे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या नांदेड जिल्ह्याच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला         

          यावेळी केंद्रीय कार्यकारिणीचे केंद्रीय उपाध्यक्ष राजकुमार बिर्ला, केंद्रीय उपाध्यक्ष अनिल शिरसाट, केंद्रीय संचालक संदीप महाजन,युवा सेना नेते सुनील पाटील कदम ,शिवसेना उपतालुकाप्रमुख नवनाथ जोगदंड उपस्थित होते याप्रसंगी अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन झाले कुलते साहेब यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जिल्ह्यामध्ये संघटनेचे काम यापूर्वी चांगले आहे जिल्हाध्यक्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन कार्यकारणी करणे कार्य प्राप्त होते म्हणून डॉक्टर पेनुरकर यांची निवड आता नांदेड जिल्हा अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे, पत्रकारासाठी पत्रकार ,भवन शासन दरबारी पत्रकाराची, नोंद तसेच पत्रकाराची एक पतसंस्था स्थापन करणारा असल्याची त्यांनी सांगितले संघटनेत काम करत असताना प्रत्येकाने प्रोटोकॉल पाळावा तसेच पद फक्त नामधारी नसून एक जबाबदारी आहे प्रत्येकाने संघटना वाढीसाठी प्रयत्न करायचे आहे असे त्यांनी पुढे मार्गदर्शन करताना सांगितले,या महत्त्वपूर्ण नूतन कार्यकारणी बैठकीत राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने काढण्यात येणाऱ्या 2024 च्या दिनदर्शिका विषयी चर्चा करण्यात आली,