March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
                  युनिट सहा, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी धडाकेबाज कामगिरी करत पुणे शहर तसेच आसपास दुचाकी वाहन चोरी करणारे सराईत आरोपी यांना जेरबंद करून त्यांच्याकडून एकूण चार गुन्हे उघड करण्यामध्ये त्यांना यश आले आहे,

                 पोलिस अमलतदार हे युनिट सहाच्या हद्दीमध्ये हडपसर येथे पेट्रोलिंग करत असताना सकटे व मुंडे यांना खात्रीशीर बातमी मिळाली, आरोपी स्वप्नील होनमाने याच्याकडे चोरीचे वाहन असून तो सासवड रोड रेल्वे स्टेशन जवळ, कोळेपडळ हडपसर येथे रस्त्यावर उभा आहे, सदर बातमीच्या अनुषंगाने त्याला मोटर सायकल सह ताब्यात घेण्यात आले, तपासांती त्याने संबंधित मोटरसायकलचे कागदपत्रे देण्यास नकार दिला, सदरची मोटरसायकल चोरीची असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली, त्याच्यावर हडपसर पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशन, शिक्रापूर पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस स्टेशन, येथे एकूण चार गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले असून, त्याच्याकडून एक लाख पंधरा हजार रुपये किमतीची दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत,

                   सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  उल्हास कदम, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंडे, प्रतीक लाहीगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, महिंद्र कडू, ज्योती काळे, सुहास तांबेकर, गुन्हे शाखा युनिट सहा पुणे यांनी केली आहे,