March 30, 2026
लोणी काळभोर प्रतिनिधी
             कालच झालेल्या.शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट निकाल लागला यामध्ये शिंदे यांचीच शिवसेना असल्याची मान्यता मिळाली असता..आता सर्वांचे लक्ष राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी कडे लागली आहे ,,हा पण निकाल अजित पवार यांच्या बाजूने लागेल का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे..राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी शिरूर लोकसभा उमेदवार जाहीर केले आहे.

             एकी कडे महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री याचे सुपुत्र पार्थ पवार इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.तर माजी खा.अमोल कोल्हे (शरद पवार गट) यांनी देखील मतदारसंघात जोरदार तयारी केली आहे.यामुळे 

*(अचानक झालेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या फुटी मुळे नेते मंडळी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हातीची परिस्थिती निर्माण झाली आहे.)* आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ चर्चेचे ठरले आहेत. यातील मावळ मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार असून शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे अजित पवार गटात जाणार का, याबाबत चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर अजित पवार यांनी कोल्हे यांना निवडणुकीत पाडण्याचे जाहीर आव्हान दिले होते. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आमच्याकडे पर्यायी आणि सक्षम उमेदवार आहेत.

          आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही आमचाच उमेदवार निवडून आणणार, असे पवार यांनी स्पष्ट केल्यानंतर कोल्हे यांनीही मैदान मारण्याची भाषा केली होती. अजित पवार यांनी जाहीर आव्हान दिल्यानंतर शिरूरमधून अजित पवार गटाचा कोण उमेदवार असणार, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पवार गटात प्रवेश करणार का, या चर्चांनी जोर धरला होता. मात्र अजित पवार यांच्याबरोबरच त्यांचे पुत्र पार्थही शिरूर लोकसभा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांना शिरूरमधून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

            अजित पवार यांनी शिरूर लोकसभेकडे विशेष लक्ष दिले असून त्याअंतर्गत येत असलेल्या मतदारसंघात बैठका आणि दौरे सुरू केले आहेत. पार्थ पवार यांनीही हडपसर भागातील राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी मंगळवारी हडपसर विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. या भागातील अजित पवार समर्थक माजी नगरसेवकांशी त्यांनी चर्चा केली. काही नगरसेवकांच्या जनसंपर्क कार्यालयालाही त्यांनी भेट दिली. त्यामुळे ते शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.