सुनील भंडारे पाटील
गेल्या बारा वर्षापासून हा कारखाना बंद होऊन, कारखान्यामधील सर्व यंत्रसामुग्री धुळ खात पडलेली आहे, कोटींच्या पटीमध्ये असलेला हा साखर कारखाना अखेरचा श्वास घेत असताना साखर आयुक्तांच्या या निर्णयामुळे कारखान्याला नवसंजीवनी मिळाली आहे, गेले बारा वर्ष बंद असलेले साखर कारखान्याचे कार्यालय आता उघडलेले असून सद्यस्थितीत कारखान्याच्या ऑडिटचे काम सुरू झाले आहे, हे कामकाज पूर्ण झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांची कमिटी नेमून कारखान्याचा चालू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे, कारखान्याचे ऑडिट लवकरात लवकर पूर्ण करून, कारखाना चालू करण्याचे तातडीने नियोजन करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मॅनेजर आहूजा,तर पुणे जिल्हा साखर आयुक्त शेखर गायकवाड, रयत शेतकरी संघटनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष रामदास कोतवाल यांनी सांगितले,
गेले अनेक वर्ष बंद पडलेला साखर कारखाना, धुळखात व कुजून चाललेली यंत्रणा आता पुन्हा चालू होणार खरंच हा निर्णय हवेली तालुक्यातील ऊस बागायत दार शेतकऱ्यांसाठी एक आधार व दिलासा देणारी बाब आहे, हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांनी व सभासदांनी आपले कष्टाचे, घामाचे पैसे एकत्र करून उभी केलेली संस्था, काही लोकनेत्यांनी,भांडवलदारांनी मोडकळीस आणली होती, याबाबतीत देखील शेतकऱ्यांनी आपला आक्रोश अनेकदा व्यक्त केला आहे, परंतु मोडकळीस आलेल्या या सहकारी संस्थेला पुन्हा एकदा जीवन संजीवनी मिळाल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले,


