नवीन पिढी मुले फार हुशार आहेत , पण जे चांगले ते त्यांचेपर्यत पोचत नाही , पोचले तरी त्यांचे मनात ठसत नाही , पण जे नको तो डीजेचा धमाका त्यांचे कानी आदळतो आणी ती नाचत सुटतात व बिघडतात . फक्त एकच वर्ष वाजणारे ते ‘ शांताबाई – बाबुराव ‘ सारखी वात्रट गाणी त्यांच्या कानी पडतात . पण ज्ञानदेव नामदेव तुकाराम मुक्ताबाई , जनाबाई या संताचे अनमोल अभंग त्यांचे कानी पोचत नाही , म्हणून संस्काराचा अभाव जाणवतो . तो संस्कार नवपिढीत रुजविण्यासाठी व्याखानाद्वारे गावोगावचे शाळा कॉलेजात जावून प्रबोधन करणे या उद्देशाने मिडगुले हे गेली दहा वर्षापासून प्रयत्नरत आहेत . स्वतः अनेक विद्यालयांत जावून आजपावेतो ६०० वर शाळांनी प्रबोधन केले असून दिवसाला ३ शाळा प्रमाणे त्यांचे काम चालू आहे . इच्छूक शाळा कॉलेज चे शिक्षक वा संस्थाचालकांनी मोफत व्याखानासाठी ७७७४ ०१ ८ ६५५ / ५ ८ या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन करणेत येत आहे .ज्ञानेश्वर मिडगुले हिवरे कुंभार व वढु बु ॥ प्रशालेत मुख्याध्यापक श्री पंचरास व छात्रांचे हस्ते सत्कार करतांना


