March 30, 2026
शिरूर विशेष प्रतिनिधी
         भारतीय स्वातंत्र्यास ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल  शिरूर तालुक्यातील मलठण येथे दि. १४ ऑगस्टला सकाळी शिरूर पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मलठण व परिसरातील धार्मिक,शैक्षणिक,प्रशासकीय,राजकीय,कला,क्रीडा, सामाजिक, आरोग्य,शेती,उद्योग,व्यापार, महिला सक्षमीकरण ,पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून मलठण गावाच्या नावलौकिकात भर टाकणाऱ्या  गुणवंतांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. 

देशसेवा करणाऱ्या स्थानिक ६० आजी माजी सैनिकांचा ही सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त सुभेदार नानाभाऊ फुलसुंदर,सुभेदार चांगदेव गायकवाड,भिकाजी गाडेकर, अशोक गायकवाड,मधुकर महाले व सर्वच सैनिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. 

यावेळी पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावा झाडे वाचवा हा संदेश देत उपस्थितांना झाडांची रोपे भेट देण्यात आली.  माजी आमदार पोपटराव गावडे,शिरूर पंचायत  समितीचे सदस्य डॉ.सुभाष पोकळे,अरुणाताई घोडे, टाकळी हाजीचे माजी सरपंच दामुशेठ घोडे, मलठणच्या सरपंच सीमाताई कोळपे,उपसरपंच सोनाली दंडवते, ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड,पोलीस पाटील अर्चना थोरात व गावातील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.         

पत्रकारिता क्षेत्रातून सामाजिकतेची जाणीव ठेवत विविध माध्यमातून सडेतोड लिखाण करणारे पत्रकार सुभाष शेटे, अरुणकुमार मोटे , साहेबराव लोखंडे यांचा ही यावेळी गौरव करण्यात आला.