March 30, 2026
गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात
      निमोणे (ता. शिरूर):- आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ग्रामपंचायत निमोणे कार्यालय येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला  

शासनाने जाहीर केलेल्या धोरणानुसार स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात विधवा महिलांना सन्मानाने जगता यावे, त्यांना ध्वजारोहणाचा मान देऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यात यावा म्हणून विधवा महिला सुवर्णा भरत काळे या विधवा महिलेच्या शुभहस्ते ध्वजारोहण करुन एक आगळा वेगळा उपक्रम निमोणे ग्रामपंचायतीचे सरपंच संजयआबा काळे , मा.सरपंच श्यामकांत भाऊ काळे , उपसरपंच सारीकाताई संतोष जाधव, मा . उपसरपंच मा .राजश्रीताई संदिप गव्हाणे , ग्रा.सदस्य सुषमा भाऊसाहेब काळे , अतुल दुर्गे , लीलाबाई दिलीप काळे , श्यामकांत ढोरजकर , लताबाई जिजाबा ताठे ,  प्रशांत अनुसे , पार्वतीबाई बाप्पू सुर्यवंशी , स्वातीताई संतोष गायकवाड ,  संजय माळी व इतर ग्रामस्थ या सर्वांनी महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे या निर्णयाने सर्वत्र स्वागत होत आहे

विधवा प्रथा निर्मूलन होण्यासाठी सध्या गावागावात विविध उपक्रम राबविले जात आहे या महिलांना समाजात सन्मान मिळावा यासाठी सामाजिक संस्था, शासन स्तरावर अनेक उपक्रम राबवले जात आहेत शिरूर तालुक्यातील निमोणे ग्रामपंचायतीने विधवा महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करीत एक कौतुकास्पद पाऊल टाकले आहे या स्तुत्य निर्णयाने सर्व स्तरातून कौतुक होत आहे विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करीत इतर गावासमोर कौतुकास्पद पायंडा घातला आहे या उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे निमोणे गावातील हा सोहळा क्रांतिकारी आणि ऐतिहासिक ठरला आहे .