यावेळी उपोषण स्थळी अनेक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर येऊन गेले असून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.परिसरातील मराठा समाजाबरोबरच इतर सर्व धर्मियांनी सुर्यकांत काळभोर यांची भेट घेऊन आपला पाठींबा दर्शविला अखिल भारतीय मराठा महासंघ ,संभाजी ब्रिगेड शिरूर लोकसभा मतदार संघ , वंचित बहुजन आघाडी यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला असून तसे पत्रक देण्यात आले आहे .तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला पण पत्रक दिले असुन वरील सर्व संघटना सुर्यकांत काळभोर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले पदाधिकाऱ्यांनी परंतु अपेक्षेप्रमाणे लोकप्रतिनिधी असणारे शिरुर,हवेली मतदारसंघातून निवडुन आलेले खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांची चौकशीही केली नसल्याने परीसरातून आश्चर्य व्यक्त होत आहे.तसेच या मतदारसंघातून आमदारकीची निवणूक लढविण्यास इच्छुक उमेदवार दोन वर्षापासून गुढघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.परंतू मराठा बांधवांसाठी आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांना पाठिंबा देणाऱ्या लोणी काळभोर येथील आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सूर्यकांत काळभोर यांची भेट घेऊन साधी विचारपूस करण्याची अथवा पाठिंबा दर्शविण्याची माणसिकता या संधिसाधू प्रव्रुत्तीमध्ये नसल्याने परीसरातून खेद व्यक्त होत आहे.आगामी काळात त्यांची जागा दाखवून देऊ अशा प्रतिक्रिया जनतेमधुन उपोषण स्थळी उमटत आहेत.
