March 30, 2026
आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
         राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत मातब्बर नेते यांनी स्वतंत्र चूल मांडली. त्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी राष्ट्रवादी पक्षाची विभागणी झाली पुणे जिल्हा अध्यक्षपदी जगन्नाथ शेवाळे यांची शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पदी निवड करण्यात आल्यानंतर पक्ष बांधणीला वेग घेण्याची सुरुवात माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांनी आळंदीतून केली.

      आळंदीतील ज्ञान दर्शन धर्म शाळेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीला चांगलाच प्रतिसाद मिळाला तरुण युवक महिला वृद्ध सर्वांचीच उपस्थिती दखलपात्र होती सदर बैठकीचे आयोजन आळंदी नगरीचे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांच्या पुढाकाराने बोलवन्यात आली होती. या बैठकीला विलास गोपाळराव कुऱ्हाडे.श्रीधर कुऱ्हाडे.वासुदेव घुंडरे.राहुल चितळकर.विलास घुंडरे.बाबूलाल घुंडरे.ज्ञानेश्वर घुंडरे. संभाजी कुराडे कैलास कुऱ्हाडे उत्तम कुऱ्हाडे दिलीप कुऱ्हाडे आबा मुंगसे मुरलीधर पाटील. मोरेश्वर आरु. रजूभाऊ थोरवे सुरेश थोरवे रमेश गव्हाणे. नंदकुमार वडगावकर. माऊली वहिले.जनार्धन पांढरे.बाळासाहेब डफळ. महिलांच्या सहभागामध्ये मालन घुंडरे.राधाबाई घुंडरे.पुष्पाताई कुऱ्हाडे. सुशीला मंजुळे.लता मिंडे. उषा नरके. युवकां मध्ये सोमनाथ कुऱ्हाडे.नवीन कुऱ्हाडे. नित्यानंद कुऱ्हाडे. सागर कुऱ्हाडे. संदेश कुऱ्हाडे. सतीश बापू कुऱ्हाडे. सिद्धेश कुऱ्हाडे. ज्ञानेश्वर गुळुंजकर अजित मधवे आणि आळंदीकर ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. माजी आमदार जगन्नाथ शेवाळे आपल्या मनोगतात म्हणाले की सत्तेसाठी पक्ष सोडून गेलेले वर टीका केली. अजित पवार छगन भुजबळ सुनील तटकरे दिलीप वळसे हसन मुश्रीफ ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते सर्वजण भाजपा मध्ये सामील झाले आणि सामील होताच मंत्री झाले. भाजपा मध्ये सामील व्हा नाहीतर जेलमध्ये जा अशी परिस्थिती असल्यामुळे घाबरून जाऊन राष्ट्रवादी पक्षातून मातेवर मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये शेवाळे यांनी केला. जे जे पक्ष सोडून गेले ते पुन्हा निवडून येत नाही असा शरद पवारांचा करिष्माही त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवला. आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची कार्यकारणी निवडीचे सर्व अधिकार स्थानिक आळंदीतील माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष माजी नगरसेवक यांना सोपवून पक्ष संघटनेसाठी काम करण्याबाबत लागेल ती मदत देण्याबाबत त्यांनी ग्वाही दिली.

       यावेळी विलास गोपाळराव कुऱ्हाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन श्रीधर कुऱ्हाडे यांनी केले. यावेळी आळंदीकरण कडून माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांचा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती बाबत सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा च्या फुटी नंतर खेड तालुक्यातून एकही कार्यकर्ता शरद पवार गटाच्या मुंबईतील बैठकीला हजर राहिला नव्हता तालुक्यातील नेतृत्वा ने त्याबाबत आपली ताकद दाखवून दिली होती मात्र आळंदीतील बैठकीला झालेली मोठ्या प्रमाणात गर्दी येणाऱ्या काळामध्ये खेड तालुक्यातील एकतर्फी समीकरणाला कशाप्रकारे उत्तर देणार हे पाहणे जिकरीचे ठरणार आहे.