आळंदीतील ज्ञान दर्शन धर्म शाळेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीला चांगलाच प्रतिसाद मिळाला तरुण युवक महिला वृद्ध सर्वांचीच उपस्थिती दखलपात्र होती सदर बैठकीचे आयोजन आळंदी नगरीचे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांच्या पुढाकाराने बोलवन्यात आली होती. या बैठकीला विलास गोपाळराव कुऱ्हाडे.श्रीधर कुऱ्हाडे.वासुदेव घुंडरे.राहुल चितळकर.विलास घुंडरे.बाबूलाल घुंडरे.ज्ञानेश्वर घुंडरे. संभाजी कुराडे कैलास कुऱ्हाडे उत्तम कुऱ्हाडे दिलीप कुऱ्हाडे आबा मुंगसे मुरलीधर पाटील. मोरेश्वर आरु. रजूभाऊ थोरवे सुरेश थोरवे रमेश गव्हाणे. नंदकुमार वडगावकर. माऊली वहिले.जनार्धन पांढरे.बाळासाहेब डफळ. महिलांच्या सहभागामध्ये मालन घुंडरे.राधाबाई घुंडरे.पुष्पाताई कुऱ्हाडे. सुशीला मंजुळे.लता मिंडे. उषा नरके. युवकां मध्ये सोमनाथ कुऱ्हाडे.नवीन कुऱ्हाडे. नित्यानंद कुऱ्हाडे. सागर कुऱ्हाडे. संदेश कुऱ्हाडे. सतीश बापू कुऱ्हाडे. सिद्धेश कुऱ्हाडे. ज्ञानेश्वर गुळुंजकर अजित मधवे आणि आळंदीकर ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. माजी आमदार जगन्नाथ शेवाळे आपल्या मनोगतात म्हणाले की सत्तेसाठी पक्ष सोडून गेलेले वर टीका केली. अजित पवार छगन भुजबळ सुनील तटकरे दिलीप वळसे हसन मुश्रीफ ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते सर्वजण भाजपा मध्ये सामील झाले आणि सामील होताच मंत्री झाले. भाजपा मध्ये सामील व्हा नाहीतर जेलमध्ये जा अशी परिस्थिती असल्यामुळे घाबरून जाऊन राष्ट्रवादी पक्षातून मातेवर मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये शेवाळे यांनी केला. जे जे पक्ष सोडून गेले ते पुन्हा निवडून येत नाही असा शरद पवारांचा करिष्माही त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवला. आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची कार्यकारणी निवडीचे सर्व अधिकार स्थानिक आळंदीतील माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष माजी नगरसेवक यांना सोपवून पक्ष संघटनेसाठी काम करण्याबाबत लागेल ती मदत देण्याबाबत त्यांनी ग्वाही दिली.
