March 30, 2026
आंबेगाव प्रमिला टेमगिरे
        मंचर पतसंस्थेच्या सात सदस्याचा राजीनामा काही दिवसापूर्वी झाली होती निवडणूक…मंचर-येथील श्री साईनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या (सन २०२२ – २०२७) ११ जागांची निवडणूक बिनविरोध झाली.            

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश समदडीया यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नाराज झालेल्या सात संचालकांनी समदडीया नसतील तर आम्हालाही संचालकपदी राहायचे नाही. अशी आक्रमक भूमिका घेऊन बिनविरोध निवड झालेल्या संचालकांपैकी सात संचालकांनी नुकतेच सहाय्यक निबंधक (सहकार) मंचर यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे सभासदांमध्ये खळबळ उडाली आहे.        

पतसंस्था स्थापनेपासून गेली ३० वर्ष समदडीया हे संचालक पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. समाजभिमुख व पारदर्शक कारभार असा पतसंस्थेचा नावलौकिक आहे. एक हजार ९०० सभासद असून ११५ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. एक कोटी १९ लाख रुपये नफा झाला आहे. मंचर, पेठ, राजगुरुनगर व पाबळ येथे पतसंस्थेच्या शाखा आहेत. संजय जयवंतराव चव्हाण, सुदाम महादेव काळे, सगाजी भीमसेन पाटील, नंदकुमार दत्तात्रय पडवळ, राजेंद्र भगवान थोरात, निलम अनिल पोखरकर, मीर यावर,आली मुरादआली संचालकांनी राजीनामे दिले आहेत.

पतसंस्था स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत संचालक मंडळाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. पण ज्या सभासदांचा पतसंस्थेशी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार नाही. संस्था वाढीसाठी कसलेही प्रयत्न केले नाहीत. अश्या काही जणांनी आडमुठेपणाची भूमिका घेऊन निवडणूक लावण्याचा प्रयत्न केला होता. समदडीया यांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. हा प्रकार सभासदांना रुचला नाही. त्यामुळे आम्ही सात संचालकांनी राजीनामे दिले आहे. असे संजय चव्हाण यांनी सांगितले.