कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षानी प्रथमच परीक्षा नेहमीप्रमाणे सुरुवात झालेली आहे. या केंद्रावर एलिमेंट्री परीक्षेसाठी २३३ तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी १०१ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. यामध्ये संभाजीराव भुजबळ विद्यालय तळेगाव ढमढेरे, कोयाळी पुनर्वसन विद्यालय शिक्रापूर, आश्रम शाळा मुखई, जनता विद्यालय पिंपरी सांडस, एकता विद्यालय करंजवणे आदी विद्यालयातील विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. आज बुधवार (दि.२८ सप्टेंबर) रोजी पहिल्या दिवशी परीक्षा केंद्राचे उद्घाटन मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, कला शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष प्रविणकुमार जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध शाळेतील कलाशिक्षक उपस्थित होते. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके यांनी परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच या परीक्षेचे महत्त्व पटवून दिले.

