सुनील भंडारे पाटील
सणसवाडी (तालुका शिरूर) बजरंग वाडी येथील सिद्धिविनायक
हॉस्पिटल च्या समोरील टपरी पासून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सात वर्षीय
मुलीला फुस लावून पळून नेल्याची खळबळ जनक घटना घडली असून अज्ञात व्यक्ती
विषयी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाआहे, या
घटनेने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे,
याबाबतीत शिक्रापूर पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार अपेक्षा
युवराज साळुंखे (वय ७ वर्ष) राहणार बजरंग वाडी सणसवाडी तालुका शिरूर जिल्हा
पुणे, या मुलीला एका अज्ञात इसमाने बजरंगवाडी येथील टपरी समोरून फुस लावून
पळून नेल्याची घटना मंगळवार ता 27 रोजी सायंकाळी सात वाजता घडली, याबाबतीत
मुलीची आई राधिका युवराज साळुंखे वय 30, धंदा नोकरी, राहणार सिद्धिविनायक
हॉस्पिटल शेजारी बजरंगवाडी, तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी शिक्रापूर
पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे, राधिका साळुंखे या कामावर असताना त्या
राहत असलेल्या घर मालकीण यांनी येऊन सांगितले की, तू लवकर घरी जा तुझी
मुलगी अपेक्षाही हरवली आहे, याबाबतीत अपेक्षा ही साधारणता सव्वा सहाच्या
सुमारास कुरकुरे घेऊन देण्यासाठी घरमालकीण व अपेक्षा टपरीवर गेले होते,
कुरकुरे घेतल्यानंतर घरमालकिणीने तिला घरी जा असे सांगितले, व ती घराकडे
निघून गेली, दरम्यानच्या काळात अपेक्षा घरी पोहोचली नव्हती, त्यामुळे
अपेक्षाच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला, ती सापडली नाही, त्यामुळे अज्ञात
कारणावरून, अज्ञात व्यक्तीने अपेक्षा या सात वर्षीय मुलीला फुस लावून
पळवल्याची तक्रार आई राधिका साळुंखे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे
दाखल केली आहे, पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
हेमंत शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आतकरे करत
आहेत,
सर्व पालकांना लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक
हेमंत शेडगे व शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे, मुले
पकडणारी टोळी वगैरे असे काही नाही, लोकांनी घाबरून जाऊ नये,
कोणाला या वर्णनाची मुलगी आढळल्यास तातडीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे
संपर्क साधावा मो, 9923600017
7 वर्ष, रंग सावळा, उंची 3 फूट, पायात पैंजण व पिवळ्या रंगाची चप्पल,
अंगात लाल रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट, भाषा मराठी बोलते, केस काळे व
बारीक,
मध्यंतरी फुस लावून लहान मुलांच्या घटनेच्या अफवांमुळे गेल्या आठवड्यात
सर्वत्र वातावरण चिंताजनक व घबराटीचे झाले होते, त्यात शिक्रापूर सणसवाडी
या भागात अशी घटना घडल्याने लोकांमध्ये खूपच घबराटीचे वातावरण तयार झाले
आहे, नागरिकांमध्ये तर्क वितर्क लावले जात आहेत,

