गुनाट प्रतिनिधी :एकनाथ थोरात
शिरूर दि.२७ सप्टेंबर २०२२ रोजी साई गार्डन मंगल कार्यालय शिरूर जिल्हा पुणे येथे जय मल्हार क्रांती संघटना शिरूर तालुका आयोजित आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या२३१ वी जयंती सांगता समारंभ संपन्न झाला.
स्व. बाबुरावजी पाचर्णे साहेब तसेच दौलतनाना शितोळे साहेब यांचे अत्यंत विश्वासू सहकारी
स्व. सतीश भाई घोलप,स्व. जयवंतरावजी खोमणे साहेब,स्व.बबन भाऊ खोमणे,स्व.सुनील आण्णा चव्हाण,स्व.भारत पाटोळे मेजर
स्व.बबनरावजी पोळ,स्व.आदिनाथराव खंडागळे सर,स्व. दत्ताभाऊ जाधव,स्व. चन्नवीर भाऊ जमादार, या दिवंगत नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
ना कार्यक्रमाचे उद्घाटक- *मा.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब* म्हणाले की महाराष्ट्रातील रामोशी, बेरड, बेडर समाज व जय मल्हार क्रांती संघटना यांच्या पाठीशी मी संघटन म्हणून सदैव उभा राहील. आणि सरकार म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे जय मल्हार क्रांती संघटना व रामोशी, बेडर, बेरड समाजाच्या पाठीशी ठाम उभे राहतील.
भारतीय जनता पार्टी हा पक्ष बहुजनांचा आहे, हे सरकार बहुजनांचे आहे, देशाचे पंतप्रधान बहुजनांचे आहेत, या पक्षाचा अध्यक्ष बहुजनाचा आहे आणि बहुजनांचे नेते दौलतनाना शितोळे यांना हा पक्ष योग्य ते न्याय देईल.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे- *मा.प्रवीणजी दरेकर साहेब* म्हणाले की महाराष्ट्रातील रामोशी, बेरड, बेडर समाजाचा मी ही एक घटक बनलो आहे, या समाजाचे व माझे हे अतूट नाते बनले आहे, आपण एकाच परिवारातील आहोत या समाजाच्या मागण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करून समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे काम भारतीय जनता पार्टी करेल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष- जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष *लोकनेते.मा.दौलतनाना उमाजी शितोळे म्हणाले की महाराष्ट्रातील रामोशी,बेरड, बेडर समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देणारा व या समाजाला मुख्य प्रवाहात आणणारा भारतीय जनता पार्टी पक्ष असून समाजाचे आधारवड आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात समाजाच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत उर्वरित मागण्याही पुढील काळात मान्य होतील असा विश्वास आहे.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष
मा.विक्रांतजी (दादा) पाटील म्हणाले की लोकनेते.दौलतनाना शितोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रामोशी, बेरड, बेडर समाजासह बहुजन समाजाचे राज्यातील सर्वात मोठे संघटन आदरणीय.दौलतनाना शितोळे यांनी केले आहे हा समाज दौलतनानांच्या पाठीशी ठाम उभा आहे, दौलतनाना शितोळे यांनी मांडलेल्या सर्व मागण्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी ठाम उभे राहू.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे- माजी मंत्री मा.राम शिंदे साहेबहे नियोजित कार्यक्रमामुळे शिरूर कार्यक्रमस्थळी राजे उमाजी नाईक यांचे दर्शन घेऊन पुढील कार्यक्रम साठी निघून गेले.यावेळी उपस्थित गणेश भाऊ भेगडे,राहुल दादा पाचर्णे,प्रदीप दादा कंद,आबासाहेब सोनवणे,बाबुरावजी पाचंगे,धर्मेंद्रजी खांडरे
याचबरोबर जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच शिरूर तालुक्यातील समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

