शिक्रापूर पोलीस ठाण्यात यासंदर्भात नसीर अबुबकर खान (वय १९ वर्षे, रा. खालसा ढाब्याजवळ, जातेगाव फाटा, ता.शिरूर, जि.पुणे, मुळ रा.पचपेडावा, ता.तुलसीपुर, जि.बलरामपुर, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात सहा चोरट्यांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात सहा चोरट्यांनी शिक्रापुर (ता. शिरूर), जातेगाव फाटा येथील खालसा ढाब्याजवळील भंगार दुकानातुन रात्रीच्या सुमारास फिर्यादी नसीर खान याला त्यांचेकडील पांढरे रंगाची स्वीफ्ट गाडी मध्ये पाठीमागील सीटवर मध्ये बसवुन फिर्यादी खान याला हाताने मारहाण केली. गाडीचे चालकाचे सांगण्यावरून पाठीमागील एका इसमाने खान यांच्या खिशातील ५७ हजार रुपये रोकड व ३० हजार रुपये किमतीचा अँप्पल कंपनीचा आयफोन मोबाईल फोन असा ८७ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेतला व फिर्यादी खान यांना अज्ञात चोरट्यांनी ऐवज चोरल्यानंतर अनोळखी ठिकाणी सोडून निघुन गेले. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार पुढील तपास करत आहेत.


