सुनील भंडारे पाटील
पुणे नगर महामार्गावर वाघोली पासून शिरूर पर्यंत अपघाताचे प्रमाण वाढले असून, बेशिस्त वाहन चालक, वाहनांचा अतिवेग यामुळे रोज कोणाचा ना कोणाचा जीव जात आहे, संबंधित खात्याने अपघात न होण्यासाठी वेगवेगळी उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे,
पुणे नगर महामार्गाचे नूतनीकरण झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांमध्ये अपघाताचे प्रमाण खूपच वाढले असून, बेशिस्त वाहन चालकांमुळे तसेच वाहनांच्या अतिवेगामुळे गंभीर व विचित्र अपघात होत आहेत, वास्तविकता संबंधित महामार्गाचे काम स्टार झाल्यामुळे, वाहनांच्या वेगामध्ये वाढ झाली आहे, वाहन चालक महामार्गावरील असणाऱ्या गाव चौकामध्ये देखील क्रॉसिंगचा विचार करत नाहीत, बऱ्याच ठिकाणी असे घडले की दुचाकी वाहने मोठ्या वाहन खाली चिरडले जात आहेत, आतापर्यंतच्या कालावधीत गेल्या सहा महिन्यात खूपच अपघात झालेत,
अपघात न होण्यासाठी प्रत्येक गाव चौकात सिग्नल बसवणे, चौकाच्या दोन्ही बाजूला मोठे स्पीड ब्रेकर बसवणे, सूचना फलक, वाहतूक नियंत्रण पोलीस, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, रॉंग साईडने येणारी वाहतूक बंद करणे,या गोष्टीचा अवलंब होणे नितांत गरजेचे आहे,

