यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे , माजी आमदार विजय शिवतारे , अश्विनी जगताप , सुनेत्रा पवार, देहूचे हभप नितीन मोरे, प्रविण तरडे , नगरसेवक शंकर जगताप , दिपक हारके , प्रो. ईस्ताद अहमद व देशभरातील ४८० श्री समर्थ सेवा केंद्रातून आलेले लाखावर सेवेकरी भावीक उपस्थीत होते . मोशी सेवा केंद्राच्या विद्यार्थ्यांचे स्वागत गिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली . त्यानंतर अथव शिर्ष कोटी वेदपठण झाले . सर्व मान्यवरांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व ज्ञानोबा तुकोबारायांचे प्रतिमेस पुष्पहार घालून सर्व मान्यवरांचा सत्कार करणेत आला . मोशी केंद्राचे सतीष गोटे यांनी प्रास्ताविकात ३५० कंपन्या बोलावून १२००० जणाना नोकऱ्या देण्यात आल्याचे सांगीतले . प्रो. ईस्ताद अहमद यांनी जोषपूर्ण भाषणात सर्व धर्म समभावाची भावना व्यक्त करत टाळ्या मिळविल्या . चंद्रकांत पाटील , आढळराव पाटील, अंबादास दानवे यांनी गुरु माऊली आण्णांचे कार्या पासून प्रेरणा मिळते असे सांगीतले .

