March 30, 2026
गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात
       निमोणे (ता.शिरूर) : येथील नेहरू शिक्षण संस्था संचलित श्री नागेश्वर विद्यालय निमोणे यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ दिनांक १० जानेवारी रोजी विद्यालयात संपन्न झाला.     

या कार्यक्रमावेळी विविध सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक विविध जुन्या रुढी पारंपारिक वर आधारित लोकनाट्य,लोकगीत सादर करून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी महाराष्ट्रातील लोककला जपत पारंपारिक लावणी नृत्य, कोळीगीत, ग्रामीण भागातील शेतकरी वर्गावर आधारित नृत्य, वीर जवानांवर देशप्रेमी गीत सादर केले यावेळी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मुख्याध्यापक संघ अध्यक्ष तुकाराम बेनके सर, मुख्याध्यापक संघ सचिव मारुती कदम सर तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निमोणे गावचे सरपंच संजय आबा काळे, उपसरपंच डॉ. संतोष जाधव, विद्यालयाचे मुख्याध्यापक शिरगिरे सर,मा. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष आप्पा काळे, निमोणे विकास सोसायटी विद्यमान चेअरमन दत्तात्रय जगदाळे, माजी मुख्याध्यापक जे.आर.काळे सर, बी.व्ही. काळे सर, पी.एस.दुर्गे सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल थोरात, माजी सरपंच दिलीप काळे, माजी सरपंच रवींद्र थोरात, आर. के. काळे सर, ग्रा.सदस्य पप्पू काळे पाटील, ग्रा. सदस्य प्रशांत अनुसे, युवा उद्योजक मयूर ओस्तवाल, भरत हिंगे, युवा उद्योजक पप्पु थोरात, विजय पोटे,दत्तात्रय जाधव,राहुल पवार,मनोज मूर्तीमोडे,सागर काळे, भरत भाऊसाहेब काळे, सुरेश कोल्हे, रवी गडकर व इतर सर्व पालक, ग्रामस्थ, महिलावर्ग,शिक्षक रुंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालन शरद दुर्गे सर, सरोदे सर यांनी केले.तसेच मनोगत निमोणे गावचे सरपंच संजयआबा काळे,उपसरपंच डॉ. संतोष जाधव, जे.आर.काळे सर,संतोष आप्पा काळे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमा वेळी या सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रोत्साहन देऊन सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना तसेच शिक्षक वृंद या सर्वांचे मान्यवरांच्या वतीने आभार मानण्यात आले. वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सर्वात शेवटी आभार वाघ सर यांनी मांडले.