March 30, 2026
पुणे प्रतिनिधी
         वरवंड (ता दौंड) येथील कुसाबाई दिहेकर सध्याचे दिवेकर या महिलेची माहे एप्रिल 1871 साली झालेल्या अखंड हिंदुस्थान मध्ये झालेल्या पहिल्या ब्रिटिश कालीन खानेसुमारी मध्ये (शिरगणती ) ‘ मरहाठे कुणबी ‘ अशी नोंद आढळल्याची माहिती इतिहासकार व शिंदे समिती नियुक्त मोडी लिपी वाचक सौ कांचन कोठावळे , पुणे यांनी माहिती दिली.

           माहिती देतांना त्यांनी सांगितले कि त्यावेळी अखंड हिंदुस्थान (भारत, पाकिस्तान व बांगलादेश )स्वरूपात होता महत्वाचे हे दास्ताऐवज अत्यंत व्यवस्थित स्वरूपात बायण्डिंग केलेल्या विशिष्ट स्वरूपात आहे. ब्रिटिश सरकार मध्ये सन 1871 मध्ये देशातील पहिली खानेसुमारी (जनगणना )ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड मेयो यांच्या आधीपत्या खाली करण्यात आली होती.

             संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये सध्या कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम चालू असताना दौंड तहसील कार्यालयातील गाव नमुना नंबर 14 मध्ये ही नोंद सापडली आहे. महाराष्ट्रातील ब्रिटिशकालीन राजवटी मध्ये इंग्रजांचे रेल्वे प्रशासनाचे मुख कार्यालय असलेल्या पुणे जिल्ह्यातील महसूल कार्यालयात नोंद सापडली आहे. दुर्मिळ अश्या मोडी लिपीतून ही नोंद सापडलेली आहे. यामुळे कांचनताई कोठावळे यांचे समाजातून आभार मानले जातं आहे व भरारी न्यूज चॅनेल च्या वतीने हार्दिक आभार माणण्यात आले,