यासंदर्भात करावयाचा नियोजना बाबत न्हावरा फाटा (ता . शिरुर) येथील कानिफनाथ मंगल कार्यालयात समस्त सकल मराठा समाज शिरुर यांची बैठक संपन्न झाली .
जरांगे यांची सभा व मुक्काम कारेगाव येथील पुणे नगर रोड वरील व्हर्लपूल समोरील १०० एकराहून आधिक जागा असणा-या ठिकाणी होणार असुन याठिकाणीच सभा व आंदोलनकर्त्यांच्या मुक्काम होणार आहे .शिरुर तालुका व शिरुर शहरातुन घरा घरातून आंदोलनकर्त्यानसाठी चपाती व शेंगदाणा चटणीचे संकलन करण्यात येणार आहे . त्याच बरोबर विविध गावातुन बुंदीचे ही संकलन करण्यात येणार आहे. यास सर्वानी प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे . त्याखेरीज शहर व तालुक्यातून रुग्णवाहिका ही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे . पुणे नगर रस्त्यावर विविध ठिकाणी पिण्याचा पाण्याचे टॅकर व फुड पॅकेटस , चहा यांचे वाटप करण्यसंदर्भात नियोजन करण्यात आले आहे .
या बैठकीला शेखर पाचुंदकर पाटील , संजय बारवकर , श्यामकांत वर्पे , आबासाहेब सोनवणे ,श्रीनिवास घाडगे , राजेंद्र जगदाळे , नानासाहेब लांडे , संभाजी कर्डिले ,भास्कर पुंडे , जयवंत साळुंखे , शोभना पाचंगे , वर्षा काळे , सुदाम कोलते ,राणी कर्डिले ,गणेश खोले , उमेश शेळके , योगेश महाजन , अविनाश जाधव , के .बी काळे , वीरेंद्र कुरुंदळे ,सचिन जाधव , रमेश दसगुडे , विलास बत्ते , गीताराणी आढाव , रुपेश घाडगे , आदित्य बो-हाडे , सत्वशीला पाचंगे , शामराव खरबस , कुमार नाणेकर आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .
