March 30, 2026
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
              सामाजीक वाटचालीत आणि साहित्यीक विश्वात आपल्या प्रतिभा संपन्न विचार शक्तीने भारूड, प्रवचन व संत साहित्याला वेगळा आयाम देणारे अग्रणी साहीत्यीक म्हणून डॉ. देखणे यांचे कार्य सदैव अजरामर आहे. माझ्या कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांचे मार्गदर्शन व योगदान कदापि विसरता येणार नाही अशा भावना श्री  संभाजीराजे विद्या संकुलाचे अध्यक्ष सुगंधराव उमाप यांनी डॉ. देखणे यांच्या श्रध्दांजलीपर शोकसभेत व्यक्त केले .          

मौजे जातेगाव बुद्रुक येथील श्री संभाजीराजे विद्या संकुलात श्रद्धांजली सभेचे सामूहीक आयोजन करणेत आले होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. ललीतकुमार इंगवले, रामदास थिटे, कुलसचिव गजानन पाठक तसेच  शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते .