सुनील भंडारे पाटील
लोणीकंद (तालुका हवेली) येथील श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सुमारे 100 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले,
सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी व श्री रामचंद्र कॉलेज आफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्वररंग कार्यक्रमाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १०० रक्तदातानी सहभाग घेतला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व चेअरमन मारुती बापू भुमकर, सायली भुमकर , प्राचार्य अविनाश देसाई यांनी उपस्थितीना रक्तदानचे महत्व सांगितले. डॉ. सुषमा तायडे, डॉ सुजाता राव, डॉ. वैशाली तुरई , प्रा. व्हि. राव . डॉ. सागर शिंदे, प्रा.मनोज जाधव, अनिल जमदाडे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.रेड प्लस ब्लड रक्तपेढी भोसरी पुणे यांनी रक्त संकलनाचे काम केले, कार्यक्रमाची आभार प्रदर्शन ग्रंथपाल युवराज किणीगे यांनी केले,

