March 30, 2026
पुणे प्रतिनिधी 
      लोणीकंद पोलीस ठाणे पुणे डबल मर्डर मध्ये ०७ महिण्यापासुन फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराच्या लोणीकंद तपास पथकाने आवळल्या मुसक्या. 

लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.२०/२०२२ भा वि कलम ३०२,३०७, ३४१, १४३, १४७, १४८, १४९, ४२७, २०१, १२० (ब), आर्म अॅक्ट कलम ३ (२५), ४ (२५) सह मोका कलम ३ (१)(२), ३(२), ३(३), ३ (४) मधील फरारी आरोपी माऊली ऊर्फ केतन रामदास कोलते याचा शोध घेवून दाखल गुन्ह्यात ताब्यात घेवून समक्ष हजर करणे बाबत मा वरिष्ठांकडुन आदेश प्राप्त झाले होते, त्याप्रमाणे लोणीकंद तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक सुरज किरण गोरे तसेच पो शि समीर पिलाणे यांनी त्यांचे खास खब-यांना आरोपी बाबत माहिती देवून रवाणा केले होते, त्यावरुन खास बातमीदारकडून प्राप्त माहिती प्रमाणे सदर आरोपी बीड येथे आपले अस्थित्व लपून रहात असले बाबत खात्रीशिर माहिती मिळाल्याने मा.सहा. पोलीस आयुक्त सो. येरवडा विभाग तसेच व पो नि. गजानन पवार सो यांचे आदेशान्वये पो उप नि सुरज किरण गोरे, पोलीस शिपाई समिर पिलाणे, पांडुरंग माने, दिपक कोकरे असे बीड येथे खाजगी वाहनाने जाऊन माहीतीची शहानिशा केली असता सदर आरोपी हा सहयोग नगर येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ आरती बिल्डींग बाहेर बीड येथे अंगात गडद निळ्या रंगाचा हाफ बाह्याचा टि शर्ट व गडद निळ्या रंगाची ट्रॅक पँट घालून पोपटी रंगाच्या स्पार्क शेवरलेट कार नंबर एमएच १२ ईजी ७७५१ यामधून येणार असल्याबाबत खास बातमिदारा मार्फत समजले. असता पोउपनि सुरज गोरे यांची टिम सहयोग नगर येथे सापळा लावून थांबुन असता मिळालेल्या बातमीप्रमाणे पोपटी रंगाची शेवरलेट कार नंबर एमएच १२ ईजी ७७५१ हि येवून थांबली. मिळालेल्या वर्णनाप्रमाणे इसम गाडीत दिसता पोउपनि सुरज गोरे यांचे टिमने त्यास ताब्यात घेवुन पुढील तपासकामी मा. सहा. पोलीस आयुक्त किशोर जाधव सो येरवडा विभाग पुणे यांचे ताब्यात दिलेले असुन पुढील तपास सुरु आहे.

सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मा. नामदेव चव्हाण सो, मा. पोलीस उपआयुक्त परीमंडळ-०४  रोहीदास पवार सो, मा. सहा. पो. आयुक्त येरवडा विभाग  किशोर जाधव सो, लोणीकंद पोलीस स्टेशन मा. व पो नि गजानन पवार सो, पो नि गुन्हे पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील स पो नि गजानन जाधव, निखिल पवार, पोलीस उप निरीक्षक सुरज किरण गोरे, पोहवा बाळासाहेब सकाटे, पोना कैलास साळुंके, विनायक साळवे, अजित फरांदे, पो. अं. समीर पिलाणे, दिपक कोकरे, पांडुरंग माने, अमोल होणे, साई रोकडे यांनी केलेली आहे.