जिजामाता व स्वामी विवेकानंदाचे प्रतिमा पुजन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे शिरूर तालुकाअध्यक्ष सूर्यकांत वाघोले , प्राचार्य सोन बापू गद्रे ,उपप्राचार्य सुनील थोरात ,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मांढरे , हरिभक्त परायण गरुड महाराज यांचे हस्ते करण्यात आले .यावेळी ग्राहक पंचायतचे संघटक बाळासाहेब चव्हाण, सहसंघटक गणेश भुजबळ , सचिव आबासाहेब थोरात , सहसचिव विनोद गव्हाणे, कोषाध्यक्ष तुषार साठे , सदस्य अनिल भंडारे ,किशोर भंडारे ,अनिल मोहिते , पर्यवेक्षक संजय शेळके, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते .प्रथम शालेय विद्यार्थिनी वैष्णवी दुप्पे व हर्षदा घोडके यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर भाष्य केले . शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या प्राची ढाळे ,वैभक्ती कांबळे ,ओंकार फड , प्रतीक शिंदे व संघर्षा शिंदे या विद्यार्थ्यांचा फेटा बांधून मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला .
मार्गदर्शन करणाऱ्या सुरेश गंगावणे ,सुभाष कुरंदळे , मुकेश कांबळे, जयश्री कोकाटे , अनुजा नरके , अंजली जगताप या शिक्षकांचाही ग्रामस्थ व संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला . मिडगुले यांनी मुलांमध्ये शिक्षणा बरोबर संस्काराची रुजवात व्हावी ,मोबाईल टीव्ही डीजे या जानी दुश्मनां पासून दूर राहावे , थोरांच्या चरीत्रांतून बोध घेवून चारीत्र्य घडवावे आदी विचार सोदाहरण मांडत तासभर मुलांना खिळवून ठेवले . प्रास्तावीक ज्ञानेश्वर कुंभार सर यांनी व आभार प्रदर्शन उपप्राचार्य थोरात यांनी केले .


