या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण तसेच पालक प्रतिनिधी शिवव्याख्याते नामदेव भोरडे, युवा उद्योजक गोरक्ष धायरकर व सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय नरके आदी मान्यवर उपस्थित होते या जयंतीच्या निमित्ताने शिव व्याख्याते नामदेव भोरडे यांनी स्वराज्याचे देखणे स्वप्न उभे राहिलेल्या राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या विषयी बहुमोल मार्गदर्शन केले तसेच मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले त्यामध्ये स्वामी विवेकानंद यांचे आपल्या जीवनात विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे व सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांचे चरित्र जीवनपट अभ्यासावे असे प्रतिपादन मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्र रक्षक राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये नाविन्या दोरगे इयत्ता सहावी,घुले तन्मय इयत्ता आठवी, नंदाज्या निमनवाड इयत्ता सातवी, इशा कोल्हे इयत्ता सहावी, कृष्णा कदम इयत्ता सातवी, अनुष्का कोल्हे इयत्ता सहावी, प्रतीक्षा पाटील इयत्ता सहावी, तसेच श्रुतिका सावंत इयत्ता पाचवी या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन आदेश गारगोटे यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीमती जयश्री कापरे यांनी केले.

