रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
खंडाळे ( तालुका शिरूर )येथील दोन ग्रामपंचायत सदस्य सरकारी जागेत अतिक्रमण केल्यामुळे अपात्र करण्यात आले असल्याचे पत्र जिल्हाधिकारी पुणे यांनी दिले आहे .
ग्रामपंचायत सदस्य ज्योती मारुती नरवडे व ग्रामपंचायत सदस्य अमोल रामचंद्र नरवडे यांनी सरकारी जागेमध्ये अतिक्रमण केल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (१) (ज-३) अन्वये अपात्र करण्यात येत असल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
याबाबत खंडाळे तालुका शिरूर येथील तेजस संपत नरवडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तक्रार केली होती. त्या अनुषंगाने सदर दोन सदस्यांना अपाञ करण्यात आले आहे. दरम्यान अपाञ करण्यात आलेले हे दोन्ही सदस्य सध्या अनुक्रमे सरपंच व उपसरपंच अशी पदे भूषवत आहेत.


