हिंदू संस्कृतीमध्ये देशामध्ये तसेच राज्यामध्ये हिंदू सणांना फार मोठे महत्त्व आहे, परंपरेनुसार वर्षभरामध्ये अनेक सण साजरे केले जातात, त्यामध्ये दरवर्षी श्रावण महिन्यात नागपंचमीचा सण येतो, परंपरेप्रमाणे सौभाग्याच लेन असलेल्या सुवासिनी नागोबाची, ग्रामीण भागामध्ये वारुळाची पूजा करतात, आज सकाळपासूनच पुणे शहराच्या पूर्वपट्ट्यातील, शिरूर तालुक्यातील सर्व गावांमधील महिला वारुळाची पूजा करताना दिसत होत्या, हिंदू संस्कृतीचा पेहराव महिलां मध्ये दिसत होता, नवविवाहितांचा उत्सुकतेने सहभाग होता, वर्षातून एकदा येणाऱ्या नागपंचमीच्या सणाला महिला एकमेकींना हळद-कुंकू लावून, हातामध्ये पूजेचे ताट, साडी, चोळी, दागिने, हातभर बांगड्या, नाकात नथ, डोईवर पदर, अशा पेहराव म्हणजे खरंच हिंदू संस्कृतीची आठवण, व जतन महिलांकडून केले जात आहे,सर्वत्र महिलांची घाई गडबड दिसत होती, नागपंचमीचा सण संपूर्ण पुणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,

